yavatmal heavy rain Sakal
विदर्भ

Vidarbha Rain : यवतमाळ जिल्ह्यात १४३ मिमी पावसाची नोंद; ओलांडली जून-जुलैची सरासरी

जिल्ह्याभरात गेल्या दोन पावसातच अतिवृष्टी झाली. जून-जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत १४३ टक्के पाऊस झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ - जिल्ह्याभरात गेल्या दोन पावसातच अतिवृष्टी झाली. जून-जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत १४३ टक्के पाऊस झाला आहे. दोन महिन्याची सरासरी ४१२ मिमी आहे. त्या तुलनेत ५९१ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले असून अनेक घरे कोसळली आहे.

पावसाळ्यात सुरवातीला पावसाने हुलकावणी दिल्याने सर्वांच्या नजरा आभाळाकडे लागल्या होत्या. पाऊस येईल की नाही, याचीच भीती होती. जून महिन्यात हुलकावणी दिलेला पाऊस जुलै महिन्यात आला. सुरवातीला पावसाची उघडझाप होती. मात्र, २२ आणि २६ जुलैला झालेल्या दोनच पावसाने हाहाकार माजविला. जिल्हाभरात नदीनाल्यांना आलेल्या पुराने गावे पाण्यात गेली. जुलै महिन्यात अनेक भागात रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला आहे.

yavatmal heavy rain

जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९२६.८० आहे, ही सरासरी पावसाने ओलांडली नाही. सध्या वार्षिक सरासरीच्या ७३ टक्के पाऊस झाला आहे. जून, जुलै महिन्याची सरासरी ४१२.२ मिमी आहे. त्या तुलनेत आतापर्यंत ५९१.१ मिमी पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या दोन महिन्यांच्या सरासरीपेक्षा १४३ टक्के पाऊस कोसळला आहे. अजूनही काही दिवस पावसाचा मुक्काम असण्याची शक्यता आहे.

पावसाळा लांबल्यास शेतकऱ्यांच्या हातात येणारे पीक जाण्याची भीती आहे. अतिपावसाने शेतकऱ्यांवर आधीच संकट आले आहे. यंदा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागांत जमिनी खरडून गेलेल्या आहेत. शेतरस्ते बंद झालेले आहेत. जिल्ह्यात कापूस, सोयाबीनसह तुरीच्या क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे.

पंचनामा करण्याचे आदेश

जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. नदी, नाल्यांना पूर आला आहे. यात हजारो हेक्टर जमिनीवरील पिके खरडून गेली आहे. कृषी विभागाने नुकसानाची पाहणी सुरू केली असून महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT