कन्हान : नगर परिषद पिपरी, कन्हान येथे घोषणा देताना सिहोरा येथील महिला.  
विदर्भ

गावकरी म्हणाले, पुढारी पोहोचतो, पण विकास नाही

सकाळ वृत्तसेवा

टेकाडी (जि. नागपूर) : कन्हान नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक दोनमधील सिहोरा गाव सध्या नगर परिषदेच्या उदासीन धोरणामुळे मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. निवडणुका आल्या की विकासाची प्रलोभने देणारा "पुढारी' पोहोचतो, पण "विकास' नाही, असा आरोप नागरिक करीत आहे. सोमवारी (ता. 16) महिलांनी नगर परिषदेला घेराव करीत स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी प्रशासनाचा निषेध केला.
जवळपास चार हजारांची लोकसंख्या असलेला सिहोरा व वाघदरेवाडी हे क्षेत्र कन्हान नगर परिषदेच्या हद्दीत आहे. सिहोरा हे पहिले ग्रामपंचायत होते. कन्हान नगर परिषदेमध्ये विलीन केल्याने गाव विकासाऐवजी समस्यांचे माहेरघर झाल्याची ओरड आहे. नगर परिषदेकडून लाखांच्या घरात स्वच्छतेवर खर्च केला जातो. तरीही सिहोरासह क्षेत्रातील बऱ्याच प्रभागांमध्ये अद्यापही घाणीचे साम्राज्य आहे. रामटेक विधानसभा क्षेत्राअंतर्गत आजी-माजी आमदारांनीदेखील सिहोराकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांचा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Iran War Statement : युद्ध संपलंय... डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, मात्र इराणे दिले हे प्रत्युत्तर

मोठी बातमी! ३ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी; ‘एसआयटी’ला ३ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव; २,७९६ शिक्षकांची माहितीच मिळेना

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

Satara Crime: साताऱ्यातील निवासी शाळेत २४ मुलांवर अत्‍याचार; केअरटेकरच्या प्रतापाने राज्यात खळबळ, मुले घाबरली अन् काय घडलं!

आजचे राशिभविष्य - 10 मार्च 2026

SCROLL FOR NEXT