commits suicide sakal media
विदर्भ

बारच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन वेटरची आत्महत्या

पहाटे तो बियर बारसमोर पडून असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले

तुषार अतकारे

वणी (जि. यवतमाळ) : शहरातील बियर बारमध्ये काम करणार्‍या एका 40वर्षीय वेटरने बारच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी घेतली. त्यात गंभीर जखमी झालेल्या वेटरचा चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना आज शनिवारी (ता. 6) मृत्यू झाला.

बालाजी मेश्राम (वय 40, रा. कोरपना ता. वणी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो वणी शहरातील श्याम टॉकीज परिसरात असलेल्या एका बियर बारमध्ये गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम करीत होता. काम झाल्यावर तो त्याच बियर बारमध्ये राहत होता. मात्र, शुक्रवारी (ता.5) रात्री त्याने बियरबारच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी मारली.

पहाटे तो बियर बारसमोर पडून असल्याचे लक्षात आल्यावर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, बालाजी याने आत्महत्या का केली, याची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकली नाही. याबाबतचा पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT