Washim Sakal
विदर्भ

Washim : बाजार समितीची निवडणूक होणार गुंतागुंतीची

तत्कालीन संचालकांनी गाठला होता भ्रष्टाचाराचा कळस; मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात

पी. डी. पाटील

रिसोड : रिसोड बाजार समितीत संचालकांनी केलेला भ्रष्टाचार व नव्यानेच शेतकऱ्यांना निवडणुकीला उभे राहण्याचा मिळालेला अधिकार यामुळे बाजार समितीची निवडणूक अधिक गुंतागुंतीची होणार आहे. तत्कालीन संचालक मात्र बाजार समिती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून उभे ठाकले आहेत.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानंतर २१ सप्टेंबर २०२० पासून प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. २ मे २०१९ ते २० सप्टेंबर २०२० पर्यंत सुमनताई भुतेकर या सभापतिपदावर विराजमान होत्या. येथील बाजार समितीमध्ये अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आली आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीतील माजी सभापती विठ्ठलराव आरू यांनी १९ नोव्हेंबर २०२१ रोजी न्यायालयात याचिका दाखल केली होती. कृषी उत्पन्न बाजार समितीतील एक गाळा खोटे कागदपत्र तयार करून व बाजार समितीच्या जुन्या पावत्यांचा वापर करून विकण्यात आला होता. त्याविरोधात विठ्ठल आरू यांनी न्यायालयात धाव घेऊन दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन सभापती व इतरांवर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते. तरीही तेच संचालक मोर्चेबांधणी करीत असून गुडघ्याला बाशिंग बांधून उभी टाकली आहे. २०१५ पासून गाळेधारकांचे करारनामे संपले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. नियमानुसार वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करून लिलाव करणे आवश्यक आहे. ते न करताच जुन्याच गाळेमालकांना कायम केल्या गेले. त्यात काही देवाणघेवाण झाल्याचीही चर्चा आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार गाळ्यांचे भाडे आकारल्या जात नाही, तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे कोणतेही निर्णय तत्कालीन संचालकांनी घेतले नाहीत. या सर्व पृष्ठभूमीवर समितीची निवडणूक होत आहे. मात्र, समितीतील भ्रष्टाचार व शेतकऱ्यांना निवडणूक लढविण्याचा मिळालेला अधिकार, यामुळे ही निवडणूक अधिक गुंतागुंतीची राहणार आहे.

२९ जानेवारीला मतदान

बाजार समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत असून बाजार समिती क्षेत्रातील सर्व मतदारांची अंतरिम यादी येत्या ७ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. २९ जानेवारी २०२३ ला मतदान, तर ३० जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे वातावरण तापले असून याबरोबरच बाजार समितीच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी ही सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT