Samruddhi Mahamarg Accident Esakal
विदर्भ

Samruddhi Mahamarg Accident: गौरी-गणपतीसाठी गावी जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला! भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी

कारच्या समोर अचानक जंगली प्राणी आला त्याला वाचवण्याच्या नादात कार तीन वेळा पलटी झाली

अंकिता खाणे (Ankita Khane)

समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. काल (मंगळवारी) गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारची वन्यप्राण्याला धडक बसल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघात झाल्यानंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले कारमधून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. तातडीने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वाशिम जिल्ह्यातील वनोजा कारंजा दरम्यानच्या चॅनल क्रमांक 196 जवळ हा भीषण अपघात झाला आहे.

समृद्धी महामार्गावर वन्य प्राण्यांचा वावर अनेक वेळा दिसून आले. महामार्गावर वावर असलेले प्राणी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. तर पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जात असतांनाच अचानक वन्यप्राणी रस्त्यावरील कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा भीषण अपघात झाला आहे.

अमरावतीच्या दिशेने जात असताना कारच्या समोर अचानक जंगली प्राणी आला त्याला वाचवण्याच्या नादात कार तीन वेळा पलटी झाली. कारमधील तीन जण गंभीर जखमी झाले. तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात दरम्यान कारमधील महिलेचा मृत्यू झाला आहे. सुनंदा अनुज दुरतकर असं मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolkata Stamped: कोलकात्यात दुर्गापूजा मंडपात चेंगराचेंगरी; १७ भाविकांचा मृत्यू

IND vs WI 5th T20I: भारत-वेस्ट इंडिज पाचव्या सामन्याचा निकाल लागला... ९-९ षटकांचा सामना नेमका कुणी जिंकला?

Resort Fire Tragedy : पर्यटकांच्या रिसॉर्टला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांसह १० पर्यटकांचा होरपळून मृत्यू, ९ गंभीर!

Couple Found Dead: पत्नीच्या वाढदिवशीच 'त्या' दोघांनी संपविले जीवन; 'आम्ही जग सोडतोय...!' कोणाला पाठवला ईमेल?

IND vs WI 5th T20I: इशान किशनचे वादळ, मोडला विक्रम; भारताने ९ षटकांच्या मॅचमध्ये किती धावा केल्या? पावसाने पुन्हा घोळ घातला

SCROLL FOR NEXT