washim 
विदर्भ

भिंतीला बोलता आले असते तर? शासकीय कार्यालयाच्या भिंतीवर गुटख्याच्या पिचकार्‍या 

राजदत्त पाठक

वाशीम : ‘भिंतीला कान असतात’ असे आपण नेहमीच ऐकत आलो आहे. भिंतीला बोलता आले असते तर, तर गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणार्‍यांना नक्कीच भिंतीची बोलणी खावी लागली असती. गुटखा बंदीमुळे भिंतींना तुच्छ करून थुंकणार्‍याची संख्या कमी होणार असली तरी याला पर्याय शोधून काही बहाद्दर मात्र पान खाऊन भिंतीवर थुंकणारच. 

गुटखा खाऊन भिंतीवर थुंकणार्‍याचे प्रमाण जास्त असल्यामुळे बहुतांश सार्वजनिक भिंतींना थुंकीने लाली चढविली असते. गुटखा पुडी खाणार्‍याची गोची होत असली तरी खाऊन थुंकणारे आपली सवय सोडायला तयार नाही. गुटखा, पान मसाला ऐवजी हे महाशय पान खाऊन भिंती लाल करण्यास तयार आहे. बस स्टँड, रेल्वे स्टेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय असे विविध प्रशासकीय कार्यालय,  शॉपिंग मॉलचा जीना,  सिनेमा टॉकीज, व्यापारी संकुल एव्हढेच नव्हे तर मंदिराच्या पायर्‍या व बाहेरील कानाकोपर्‍याच्या ठिकाणच्या भिंतीवर थुंकीचे डाग आढळून येतात.

बर्‍याच ठिकाणी ‘येथे थुंकु नये’,‘येथे थुंकण्यास मनाई आहे’ अशा आशयाचे फलक लावले असतात. जणू काही या फलकाचा अर्थ अशा थुंकणार्‍यांना थुंकायचे असेल तर येथे थुंकु शकतात असा संदेश हे महाभागासाठीच आहे अशा आविर्भावात फलकावर थुंकून हे मोकळे होता. यावर अंकुश कोणी लावायचा हा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
 

नवीन इमारतीच्या भिंतीही रंगल्या
वाशीमला जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर या ठिकाणी विविध कार्यालयाच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले. भरपूर निधी खर्च करून नागरिकांच्या सेवेसाठी अद्ययावत इमारती उभ्या झाल्या. या इमारतीमध्ये कार्यालयाचे कामकाजही नियमितपणे सुरू झाले. मात्र, काही महिन्यातच या इमरातीच्या पायर्‍या, स्वच्छतागृह, कानेकोपरे थुुंकीच्या पिचकार्‍यांनी रंगविल्या गेल्याचे चित्र आहे.

अनेक कार्यालयात गुटखा, पान खाण्यास बंदी   
नवीनच बांधण्यात आलेल्या इमारतींची दशा पाहून अनेक जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी कार्यालयात कर्मचार्‍यांनी कार्यालयीन वेळेमध्ये पान, सुपार, गुटखा, तंबाखूचे सेवन करून नये, असा फतवा काढला. मात्र, वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करतील ते कर्मचारी कसले चोरून लपून पान, सुपारी खाऊन थुंकण्याची सवय अनेक कर्मचारी जोपासतच असल्याचे दिसून येत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT