wild boar attack sakal
विदर्भ

घरासमोर कपडे धुणाऱ्या तरुणीवर रानडुक्करानं केला हल्ला

राहत्या घरी कपडे धुताना बेभानपणे तरुणीवर रानडुकराने हल्ला केला

अभय भुते

जेवनाळा : राहत्या घरी कपडे धुताना बेभानपणे तरुणीवर रानडुकराने हल्ला केला. यात तिच्या डाव्या पायाला जबर जखम झाली. पाय मांडी च्या बाजूने चिरला गेला. ही घटना पालांदूर येथे मंगळवार ला सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. रोहिणी चंद्रशेखर बारापात्रे (२२) राहणार पालांदूर तालुका लाखनी असे जखमी तरुणीचे नाव आहे.नित्यनेमाने रोहिनी आपल्या घराच्या मोकळ्या जागेत कपडे धूत होती. खालच्या मानेने कपडे धूत असताना रानटी डुक्कराने अचानक पणे रोहिणी वर हल्ला चढविला. क्षणात रोहिनी बाजूला फेकली गेली.(While washing clothes at the residence, the girl was unexpected attacked by a Wild boar)

रानटी डुक्कराने तिच्या मांडीला चिरत नेत जखमी केले. तत्काळ आरडाओरड झाली. शेजार पाजार जमा झाले.शेजाऱ्यांनी मोठ आवाज केल्यामुळे डुक्कर घटनास्थळावरून पसार झाला. रोहिणीचा पाय रक्तबंबाळ झाल्याने चिंता वाढली. तिला तत्काळ ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाला पुरविण्यात आली. वनक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे यांच्या निर्देशानुसार क्षेत्र सहाय्यक शेख, बिटर रक्षक नितीन पारधी यांनी घटनास्थळाला भेट दिली. ग्रामीण रुग्णालयात जखमी ची भेट घेत पंचनामा केला. जखमी रोहीनीवर ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचार सुरू आहेत.(injured Rohini is undergoing treatment at Palandur Rural Hospital)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT