elephant 
विदर्भ

यवतमाळ : हत्तीच्या धडकेत महिला ठार

शंकर जोगी

वडकी (यवतमाळ) : सराटी जंगलातील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी आणलेला हत्ती काल (ता. 2) पासून बेपत्ता होता. तो सैरवैर हत्ती जंगल क्षेत्र सोडून गावात पोहोचला. सराटीपासून जवळ असलेल्या चहांद या गावात हत्तीने धुमाकूळ घातला. पिसाळलेल्या हत्तीने अर्चना मोरेश्वर कळसंगे (वय 30) ही महिला बैलाचे शेण काढत असताना तिला हत्तीने आपटून ठार केले. गावकऱ्यांनी आरडाओरड केली असता पिसाळलेल्या अवस्थेतील हत्ती सैरावैरा पळाला. याच हत्तीने वर्धा जिळ्यातही धुमाकूळ घातला.

लगतच्या पोहना येथील नामदेव मुकींदा सवाई (वय 72) या व्यक्तीला जखमी केले आहे. या पिसाळलेल्या हत्तीमुळे परिसरातील जनता भयभीत झाली. हत्तीला वनविभागाने पकडल्याची माहिती मिळाली आहे. महिलेला ठार केल्यानंतरही वनविभागाच्या एकही कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नव्हते. शेवटी वडकी येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक कांग्रेडवार यांनी महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राळेगाव येथे पाठविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT