Umeshwar Waghade sakal
विदर्भ

Sakoli News : न्यायालय चौकात भरदिवसा झाडावर चढून युवकाने घेतला गळफास

साकोली शहरातील न्यायालय चौकात आज, शनिवारी एका युवकाने झाडाला दोर बांधून फाशी घेवून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

साकोली(जि. भंडारा) - शहरातील न्यायालय चौकात आज, शनिवारी एका युवकाने झाडाला दोर बांधून फाशी घेवून आत्महत्या केली. याबाबत साकोली पोलिसांनी नोंद केली असून, घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. मृताचे नाव उमेश्वर सूर्यभान वाघाडे (वय ३८, मांगली/किटाडी) असे आहे.

शहरातील लाखांदूर मार्गावरील टी-पॉइंट गोवर्धन चौकात बालोद्यान आहे. तेथील करंजीच्या झाडावर सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास मांगली/किटाडी येथील उमेश्वर वाघाडे याने झाडावर चढला. त्याने तेथे लागलेल्या बॅनरच्या चौकटीचा दोर आपल्या गळ्यात लावून गळफास लावला.

ही घटना लक्षात येताच महामार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी आरडाओरडा केला. याची माहिती होताच साकोलीचे ठाणेदार संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रशांत वडूले घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी झाडावरून मृतदेह उतरवून उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार मृताचे लग्न २०१७ ला झाले होते. परंतु, मुलबाळ नव्हते. काही दिवसांपूर्वी सेंदरवाफा येथे बहिणीकडे आला होता. तो मानसिक तणावात राहात असल्याचे समजले आहे.

मृताने घटनास्थळी झाडाखाली कापडी पिशवी आणि चप्पल काढून ठेवली होती. या आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. शहरात रहदारीच्या चौकात सर्वांच्या समोर एक व्यक्तीने गळफास लावल्याची ही शहरातील पहिलीच घटना आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत वडूले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT