Dhule Crime News Esakal
व्हिडिओ | Videos

Dhule Crime News : ट्रॅव्हल्स अडवली, चाकू दाखवला, धुळे साक्री रस्त्यावर गुंडांचा धुमाकूळ...

निखिल सूर्यवंशी - सकाळ वृत्तसेवा

पाचसो रूपये एन्ट्री फी निकाल...सबको लागू है...जलदी दे...का खोपसू तुला..., अशी चाकू काढून फिल्मी स्टाईल धमकी देत गुजरातहून धुळेमार्गे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला धुळ्यातील वन्या आणि काल्या नामक तरूण गुंडांनी लुटले. ही घटना सोमवारी (ता. २०) मध्यरात्रीनंतर दोनला घडली. या प्रकरणी ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने दोघा गुंडांचा कारनामा कैद केल्यानंतर त्यांचा धुळे शहर पोलिस पथकाकडून कसून शोध सुरू आहे.

गुजरातहून नागपूर, मुंबई, औरंगाबादकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स धुळे शहरातील साक्री रोडमार्गे जातात. या मार्गावर अशा ट्रॅव्हल्स गुंडांकडून लुटल्या जात असल्याचे प्रकार वेळोवेळी घडले आहेत. रोज याच मार्गाने जावे लागत असल्याने गुंडांना त्यांच्या मागणीप्रमाणे पाचशे रूपये एन्ट्री फी दिलेली बरी, नाही दिले तर जीवाचे बरे वाईट केल्यास ऐनवेळी मदतीला कोण येईल या भितीने ट्रॅव्हल्स चालक गुंडांची मागणी पूर्ण करतात.

सोमवारी मध्यरात्रीनंतर असा प्रकार पुन्हा उजेडात आला. चाकूचा धाक दाखवत ट्रॅव्हल्स लुटल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धुळे शहर पोलिस पथक गुंड वन्या आणि काल्याच्या मागावर आहेत. यासंदर्भात अद्याप गुन्हा दाखल नसून रात्रीपर्यंत दोघा गुंडांना पकडण्यात यश येईल, असा विश्‍वास पोलिसांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Update: पहाटेपासूनच मुंबईत पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात; रस्त्यांना तलावाचे स्वरूप, पाच दुर्घटनांनी वाढवली चिंता!

'धुरंधर'नंतर रणवीरची नवी खेळी! यावेळी शत्रू माणसं नाहीत, तर..., 300 कोटींच्या सिनेमाची जोरदार चर्चा

Ayodhya Temple Theft : अयोध्या मंदिर दानचोरी! महाकुंभ काळात सर्वाधिक अपहार, मेहुण्यांनी लाटले कोट्यवधी; मालमत्ता खरेदी

Gold Bra Viral Photo : असावा एखादा छंद! महिला खासदाराच्या घरात ५ कोटी कॅश, २७ किलो सोन्याचे ब्रा, अंडरवियर सापडले?; पोलिसांनी धाड टाकली अन्

Pune Crime : ‘एपीआय’ला मारहाण केल्याप्रकरणी पोलिस हवालदार निलंबित

SCROLL FOR NEXT