Ashadi wari 2022 Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2 horse ringan malshiras sakal
वारी

भक्ती अन् चैतन्यात न्हाले गोल रिंगण

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांमध्ये अमाप उत्साह

विकास काटे

माळशिरस : काळ्याभोर ढगांनी भरलेले आकाश... भाविकांची प्रचंड गर्दी... पालखीशेजारी फडकणाऱ्या भगव्या पताका... मनोहरी रांगोळी... ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष... टाळ-मृदंगाचा गजर... अशा जल्लोषपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात माउलींच्या अश्वाने बेफाम वेगात दोन फेऱ्या मारून पुरंदावडे (ता. माळशिरस) येथील गोल रिंगण रंगविले. अमाप उत्साहाने सकाळपासून जमलेल्या लाखो भाविकांनी हा रिंगणाचा भक्तिमय सोहळा डोळ्यात साठविला. पालखी सोहळ्यातील आज गोल रिंगण असल्याने वारकऱ्यांमध्ये कमालीचा उत्साह होता. माउलींचा रथ पुरंदवडे येथे दोन वाजून ४० मिनिटांनी रिंगणाजवळ आला. त्याअगोदर अश्वासह दिंड्या बाहेरील रिंगणात होते. दिंड्यापाठोपाठ माउलींच्या पालखीने बाहेरील रिंगणात प्रवेश केला. दरम्यान, दिंड्यांमधील पताकाधारी आणि तुळशीवाल्या महिलांना मध्यभागी प्रवेश देण्यात आला.

दिंड्यांतून वाट काढीत पालखी बाहेरील रिंगणात मधोमध उभारलेल्या मंडपात विराजमान करण्यात आली. दरम्यानच्या काळात दिंड्यांमधील टाळ-मृदंगाचा गजर टिपेला पोचला होता. देहभान विसरून वारकरी नाचत होते. रिंगणापूर्वी रिपरिप पाऊस पडून गेला होता. मात्र, पुन्हा आकाशात काळ्याभोर ढगांनी दाटी केली होती. दिंड्यांमध्ये हरिनामाचा गजर सुरू होता. रिंगणात रांगोळ्या काढल्या होत्या. रिंगणाची पाहणी बाळासाहेब चोपदार, उद्धव चोपदार यांनी केली. त्यानंतर तीन वाजून चाळीस मिनिटांनी भोपळे दिंडीच्या मानकऱ्याने रिंगणाला तीन फेऱ्या मारल्या. त्यानंतर स्वाराचा अश्व आणि माउलींच्या अश्वाने रिंगणात दौड सुरू केली. काही क्षणात दोन्ही अश्वांनी बेफाम वेगात रिंगणात दोन फेऱ्या मारल्या अन् माउली नामाने अवघे रिंगण रंगून गेले. रिंगण संपताच अश्वांच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. आता पंढरपूर जवळ आल्याने एकीकडे आनंद आणि रंगलेल्या रिंगणामुळे वारकऱ्यांचा आनंद द्विगुणित झाला. उडीच्या खेळानंतर रिंगणाची सांगता झाली.

आज रिंगण अन् धावा

पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण बुधवारी सकाळी पाणीव पाटीजवळ होणार आहे. तसेच, वेळापूरजवळ धावा होणार आहे. तेथे पालखीसमोर मानाचे भारुड होईल.

गेल्या चोवीस वर्षांपासून वारी करते आहे. मात्र, दोन वर्ष वारी झाली नाही. त्यामुळे डोळ्यात पाणी आले. मात्र, यंदा वारी होत असल्याचा चैतन्य सोहळ्याने ते दुःख कमी झाले आहे. हा आनंद कुठेच भेटणार नाही. मागील दोन वर्षांची वेळ पुन्हा येऊ नये.

- मीना पासलकर, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Local Megablock: मुंबईकरांचे हाल होणार! तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, १०९ लोकल फेऱ्या रद्द; कसे असेल नियोजन?

Sharad Pawar on NEET Case : शरद पवार नीट प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले, नीट पेपर प्रकरणात दोन महिन्यांत सकारात्मक परिणाम दिसतील

IND vs AFG: भारताविरुद्धच्या कसोटीत रशीद खान का खेळत नाही? ; जाणून घ्या नेमकं कारण

Latest Marathi News Update: बाजारसमितीतून थेट कांदा खरेदीचा मार्ग मोकळा; सोमवारपासून खरेदीला सुरुवात

Chandrashekhar Bawankule: जमीन हस्तांतर, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना; महसूलमंत्री बावनकुळे यांचा निर्णय

SCROLL FOR NEXT