Fashion 
युथ्स-कॉर्नर

फॅशन टशन : कॅज्युअल बर्मुडा स्टाइल

माधुरी सरवणकर-तेलवणे

कॅज्युअल वेअर म्हटलं, की शर्ट, ट्राऊझर, शूज असं काहीसं चित्र डोळ्यांसमोर येतं. एखादी बिझनेस मीट असूदेत किंवा दररोज ऑफिससाठी, आतापर्यंत सर्वांनी हा पेहराव फॉलो केला आहे. मात्र, आता कॅज्युअल वेअरमध्ये बर्मुडा पॅन्टने एन्ट्री केली आहे. हो अगदी खरंय. तुम्ही म्हणाल बाहेर फिरायला किंवा घरात घातली जाणारी पॅन्ट चक्क कॅज्युअल म्हणून वापरायची? हो, पण त्यामध्ये ट्विस्ट आहे. ही स्टाइल करताना तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बर्मुडा आणि कॅज्युअल वेअरच कॉम्बिनेशन हटके प्लस कुल आहे. नेहमी ऑफिसला जाताना अनेक जण ट्राऊझर, शर्टला प्राधान्य देतात. वारंवार तीच ती स्टाइल करून कंटाळाही येतो. पावसाळ्यात कपडे भिजण्याच्या भीतीत ऑफिसमध्ये शॉर्ट पॅन्ट घालून गेल्यास बरं झालं असतं, हाही विचार अनेकांच्या डोक्यात केव्हा तरी चमकून गेला असेलच. पण तेही अन् प्रोफेशनल दिसू शकतं.  

त्यामुळं तुमची हौस व प्रोफेशनलीझम टिकवण्यासाठी कॅज्युअल बर्मुडा स्टाइल ही भारी संकल्पना आहे. सिंथेटिक, पॉलिस्टर, कॉटन फॅब्रिकमधील गुडघ्यापर्यंतच्या बर्मुड्यावर तुम्ही कोणताही शर्ट पेअर करू शकता. त्यावर फुल साइजचे सॉक्स, शूज छान दिसतात. 

तुम्हाला माहिती आहे का, ब्रिटनमध्ये बर्मुडा नावाचा प्रदेश आहे. बर्मुड्याचा जन्म येथेच झाल्याचं अनेकांना वाटू शकते. पण असं नाहीये. ब्रिटिश मिलिटरीचा हा युनिफॉर्म होता. त्यावरून ही स्टाइल घेतली असल्याचं मानलं जातं. हा ट्रेन्ड परदेशात पाहायला मिळतो. मुलीदेखील ही स्टाइल फॉलो करून हवा करू शकतात. 

अशी करा स्टाइल
1) कॉटन किंवा पॉलिस्टर फॅब्रिकच्या पॅन्टवर प्लेन, चेक्स शर्ट छान दिसतात. 
2) टाय व ब्लेझरदेखील मस्त दिसेल. 
3) हातात तुम्ही लॅपटॉप बॅग घेऊन कुल दिसाल. 
4) मुलीदेखील ही स्टाइल फॉलो करू शकता. फ्लॅट सॅण्डलवर देखील ही पॅन्ट छान दिसते.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र मैदानात; ४ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा, हातात फक्त तिरंगा!

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर ट्रॅफिक जाम! टेम्पो पलटी झाल्याने वाहनांच्या रांगाच रांगा, 4-5 तासांपासून भीषण कोंडी

Revanth Reddy Remarks : ‘महादेव गरिबांचे, राम श्रीमंतांचे’ रेवंत रेड्डींच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले; भाजप आक्रमक

Marathi News Live Updates: अंगारकी चतुर्थीनिमित्त मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी, मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण

World Heart Day 2026: कार्डिओफोबिया म्हणजे काय? लक्षणे, कारणे आणि उपचार याबद्दल संपूर्ण माहिती एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT