क्‍लिअर फंड्‌सकडून एकाच मंचावर तीन हजार गुंतवणूक योजना

पीटीआय
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

मुंबई : म्युच्युअल फंडांमधील गुंतवणुकीने ऐतिहासिक टप्पा गाठला असला तरी फंडातील गुंतवणुकीसाठी वेगवेगळे शुल्क द्यावे लागते. याबबत क्‍लिअर फंड्‌सने म्युच्युअल फंड गुंतवणुकीच्या किमान तीन हजार योजना एकाच मंचावर किमान शुल्क आकारून गुंतवणूकदारांना डिजिटल पर्याय उपलब्ध केला आहे.

म्युच्युअल फंड गुंतवणुकीवर प्रत्येक ब्रोकरकडून वेगवेगळे शुल्क आकारले जाते. गुंतवणुकीची मोठी रक्कम असल्याने गुंतवणूकदाराला जादा शुल्क द्यावे लागते. दिर्घकाळ गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना याचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्‍यता आहे. शुल्क हा मुद्दा आहेच पण अनेकदा चुकीची माहिती देऊन फंड योजना विक्री करण्याचे प्रकार घडतात. म्युच्युअल फंडाची गुंतवणूक पारदर्शक करण्यासाठी "क्‍लिअर फंड्‌स" हा डिजिटल मंच विकसित केला आहे. यामध्ये जवळपास सर्वच आघाडीच्या फंड कंपन्यांच्या तीन हजारांहून अधिक योजना उपलब्ध असल्याचे क्‍लिअर फंड्‌सचे मुख्य कार्यकारी कुनाल बजाज यांनी सांगितले. वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर गुंतवणूकदाराला काही मिनिटांत फंडांतील गुंतवणूक करणे शक्‍य असल्याचा दावा त्यांनी केला. यासाठी क्‍लिअर फंड्‌सकडून केवळ 199 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. क्‍लिअर फंड्‌समधून एसआयपी योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हे शुल्क केवळ एकदाच भरायचे असल्याने फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले. क्‍लिअर फंड्‌सचे सध्या सहा हजार गुंतवणूकदार असून वेबसाईटवर गुंतवणूक सल्ला आणि अभ्यास अहवाल निशुल्क उपलब्ध केले जातात, अशी माहिती त्यांनी दिली.