हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी

वृत्तसंस्था
शुक्रवार, 21 जुलै 2017

भोपाळ: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी राज्यातील हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय विधानसभेत जाहीर केला. हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांची भविष्यात होणारी परवड थांबवण्यासाठी चौहान यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेची अंमलबजावणी आजपासूनच झाल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवराजसिंह चौहान यांनी अलीकडेच बीएसएफच्या जवानांना भेट जाहीर करत बीएसएफच्या जवानांच्या वाहनास मध्यप्रदेशमध्ये प्रवेश करताना टोल टॅक्‍स न आकारण्याचा निर्णय घेतला होता. आता हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना भरघोस मदतीचा निर्णय घेतला आहे.