दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारींवर हल्ला

वृत्तसंस्था
रविवार, 20 ऑगस्ट 2017

बवाना येथील झंडा चौकात एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. निवडणुक प्रचाराच्या बैठकीचा प्रचार करत असताना मनोज तिवारी यांच्यावर काही अज्ञांत लोकांनी हल्ला केला. मनोज तिवारी यांच्यावर दगडफेक आणि लाकडाच्या दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

नवी दिल्ली : भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्यावर शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. एका कार्यक्रमादरम्यान हा हल्ला झाला असून, ते थोडक्यात बचावले.

भाजपा प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, बवाना येथील झंडा चौकात एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. निवडणुक प्रचाराच्या बैठकीचा प्रचार करत असताना मनोज तिवारी यांच्यावर काही अज्ञांत लोकांनी हल्ला केला. मनोज तिवारी यांच्यावर दगडफेक आणि लाकडाच्या दांड्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केले. या हल्ल्यातून मनोज तिवारी सुखरुप बचावले आहेत. 

तिवारी यांच्यावर लाकडाच्या तुकडे आणि दगडफेक केली. या सर्व घटनेची पोलिसांमध्ये तक्रार आली असून अज्ञांतावर गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळाच्या मिळालेल्या व्हिडिओ फुटेजनुसार या घटनेची चौकशी सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.