काश्मीर: बीजबेहरा येथे सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला

वृत्तसंस्था
शनिवार, 17 जून 2017

दहशतवाद्यांनी बीजबेहरा येथील कॅम्पला लक्ष्य करून गोळीबार व ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील बीजबेहरा येथील लष्कर व केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर आज (शनिवार) सकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी बीजबेहरा येथील कॅम्पला लक्ष्य करून गोळीबार व ग्रेनेड फेकले. या हल्ल्यात काही नागरिक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जवानांकडून दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या गोळीबारात एकही जवान जखमी झालेला नाही.

भारतीय जवानांनी अरवानी गावात शुक्रवारी ठार मारलेले लष्करे तैयबाचे दहशतवादी जुनैद अहमद मट्टू आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांचे मृतदेह आज गोळीबाराच्या ठिकाणाहून ताब्यात घेतले.