बिहारमध्ये पूरस्थिती गंभीर; देशभरात पावसाचे 90 बळी

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

पाटणा : बिहारमधील पूरस्थिती गंभीर स्वरूप घेत आहे. पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या मंगळवारी 56 वर पोचली. राज्यातील 13 जिल्ह्यांतील 69.81 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. 

पुरामुळे अरारिया जिल्ह्यात सर्वाधिक 20 जणांचा मृत्यू झाला आहे. पश्‍चिम चंपारण (9), किसनगंज (8), सीतामढी (5), माधेपुरा (4), पूर्व चंपारण, दरभंगा आणि मधुबनीमध्ये प्रत्येकी तीन; तर शेवहार जिल्ह्यात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे विशेष सचिव अनिरुद्ध कुमार यांनी दिली.

पूरग्रस्त भागांतील 1.61 नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. त्यापैकी 85 हजार 949 जणांना विविध ठिकाणच्या 345 मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. 

आसाममध्ये पूरस्थितीमुळे आतापर्यंत 28 जणांचा मृत्यू झाला आहे; तर पश्चिम बंगालमध्ये सात जणांचा मृत्यू झाला आहे. बंगालमधील पाच जिल्ह्यांतील एक लाखांहून अधिक नागरिकांना, तर आसाममध्ये 33 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची मदत करण्यासाठी लष्कराचे जवान स्थानिक प्रशासनास सहकार्य करत आहेत.

नितीशकुमार यांनी केली हवाई पाहणी 
बिहारमधील पूरस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी, सलग दुसऱ्या दिवशी दरभंगासह अन्य पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. राज्याचे मुख्य सचिव अंजनीकुमार सिंह हेही त्यांच्यासोबत होते. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन नितीशकुमार यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त केलेल्या भाषणात दिले होते.