आऊटसोर्सिंग सेवा क्षेत्रात आरक्षण 

आऊटसोर्सिंग सेवा क्षेत्रात आरक्षण 
Updated on: 

पाटणा : बिहारमध्ये आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या विविध सेवा क्षेत्रांमध्ये आरक्षण ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बिहार राज्य सरकारने घेतला असून, यासंबंधीच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने आज मंजुरी दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्य सचिव ब्रजेश मेहरोत्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण निर्णयदेखील या बैठकीत घेण्यात आले. 

राज्यामध्ये पोलिसांसाठी आठ नवी प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार असून त्यासाठीच्या 150.64 कोटी रूपयांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. या सर्व केंद्रांमध्ये नवनियुक्त आठ हजार पोलिस कर्मचाऱ्यांना (महिला कर्मचाऱ्यांसह) प्रशिक्षण देण्यात येईल, असे मेहरोत्रा यांनी नमूद केले.

बिहार आकस्मिक निधीसाठी 52 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीच्या माध्यमातून पाटण्यासारख्या अन्य शहरांचा कायापालट घडवून आणला जाणार आहे. राज्यातील तांत्रिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांच्या 70 जागांना मान्यता देण्यात आली असून, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या 76 जागांना मान्यता देण्यात आली आहे. पश्‍चिम चंपारण्य आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये दोन पॉलिटेक्‍निक महाविद्यालये सुरू केली जाणार असून, यासाठी ही पदे मंजूर करण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra Latest Marathi News Live Update
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav announces a peacock conservation project and development initiatives ahead of Sinhastha 2028.
EduLeaders Promotes Digital Learning in Uttar Pradesh
PM Kisan ₹2000 installment payment status
Marathi News Esakal
www.esakal.com