'ब्ल्यू व्हेल'च्या लिंक्‍स हटवा; केंद्र सरकारचे गुगल, फेसबुक, इन्स्टाग्रॅमला आदेश

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली : किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या 'ब्ल्यू व्हेल' या ऑनलाईन धोकादायक गेमच्या लिंक्‍स तातडीने हटवा, असे निर्देश केंद्र सरकारने फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म; तसेच गुगल मायक्रोसॉफ्ट आणि याहूसारख्या सर्च इंडिन्सला दिले आहेत. या गेममुळे मुंबईसह देशातील विविध भागांत काही मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्याच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. 

ब्ल्यू व्हेल चॅलेंज खेळताना अनेक मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना देशात समोर आल्या आहेत. त्यामुळे तुम्ही या धोकादायक गेमच्या; तसेच त्याच्याशी मिळत्याजुळत्या नावाच्या गेम्सच्या लिंक्‍स हटवाव्यात, असे इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने या कंपन्यांना 11 ऑगस्टला पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. कायदा आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री रवीशंकर प्रसाद यांच्या सूचनेनुसार हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

50 दिवस सुरू असणाऱ्या या गेममध्ये विविध टास्क पूर्ण करायचे असतात. अखेरचा टास्क आत्महत्या करण्याचा असतो. या गेमच्या प्रभावाखाली मुले आत्महत्या करत असल्याच्या घटना उघङकीस येत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र, मध्य प्रदेश; तसेच केरळसारख्या राज्यांनी या गेमवर बंदी आणण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनीही सोमवारी या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत केंद्र सरकारने हे पाऊल उचलले. 

इंटरनेटवर सहज उपलब्ध असलेल्या या गेमबाबत इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने चिंता व्यक्त केली आहे. सोशल मीडियाचा वापर करत या गेमचे प्रशासक मुलांना हा गेम खेळण्याचे आमंत्रण देतात. या गेमच्या नादात अनेक मुले स्वतःस जखमी करून घेणे, आत्महत्या करणे यासारखी पावले उचलतात, ही गंभीर बाब असल्याचे या मंत्रालयाने नमूद केले आहे.

Web Title: marathi news marathi websites Delhi News Blue Whale Google Facebook Inastagram