"जाधव कुटुंबीयांच्या सुरक्षेची हमी द्यावी'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

नवी दिल्ली : भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या पत्नी आणि आईला त्यांना तुरुंगात भेटायची परवानगी दिल्यास या दोघींच्या सुरक्षेची पूर्ण हमी पाकिस्तान सरकारने द्यावी, अशी मागणी भारताने केली आहे.

जाधव यांच्यावर हेरगिरीचा आरोप ठेवत पाकिस्तानने त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. कुलभूषण यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याची परवानगी देऊ, असे काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने म्हटले होते. "पाकिस्तानने भेटण्याची परवानगी दिल्यास जाधव यांच्या पत्नी आणि आईच्या सुरक्षेची हमी पाकिस्तान सरकारने द्यावी. तसेच, या दोघींबरोबर भारतीय उच्चायुक्तांनाही भेटण्याची परवानगी द्यावी,' अशी मागणी भारताने केली आहे.

Web Title: new delhi news guarantee the security of kulbhushan Jadhav family