तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना: राहुल गांधी

demonetization
demonetization

नवी दिल्ली - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार टीका करत कवितेच्या माध्यमातून नागरिकांचे अश्रू सरकारला दिसलेच नसल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या वृद्ध व्यक्ती रडत असतानाचा फोटो ट्विट करत म्हटले आहे, की एक आँसू भी हुकूमत के लिए ख़तरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना. याबरोबरच नोटाबंदीचा निर्णय हा वाईटच होता. आम्ही लाखो प्रामाणिक भारतीयांच्या बरोबर उभे आहोत. पंतप्रधानांनी कोणताही विचार न करता घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले असल्याचे राहुल गांधींनी म्हटले आहे.

राहुल गांधी आज (बुधवार) गुजरातच्या दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते सुरतमधील नागरिकांशी संवाद साधणार आहेत. काँग्रेसकडून आज देशभरात काळा दिवस पाळण्यात येत आहे. तर, सत्ताधारी भाजपने काँग्रेसच्या या निर्णयाला देशभर विरोध करण्याचे ठरविले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com