उपचार नाकारल्याने सात महिन्यांच्या बालकाचा मृत्यू

वृत्तसंस्था
बुधवार, 26 जुलै 2017

राजस्थानमधील घटना; मृतदेह खांद्यावरुन नेहला

कोटा: आदिवासी भागातील एका सात महिन्यांच्या बालकाला आरोग्य केंद्रातील डॉक्‍टराने उपचार नाकारल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना राजस्थानमध्ये घडली. मृत्युपश्‍चात त्याचा मृतदेह सहा कि.मी अंतरापर्यंत खांद्यावरून नेण्याची वेळ त्याच्या कुटुंबीयांवर आल्याचेही समोर आले आहे.

मृत बालकाचे नाव सनी देओल सहारिया असून, त्याला रविवारपासून सर्दी व खोकल्याचा त्रास सुरू झाला होता. त्यामुळे त्याला चोरखाडी या गावापासून सहा कि.मी दूर अंतरावर असलेल्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी खांद्यावरून आणण्यात आले होते. या वेळी त्याची आजी, आजोबा व आई त्यासोबत होती. रुग्णालयात पोचल्यानंतर डॉक्‍टरची कामकाजाची वेळ संपली असून, ते घरी गेल्याचे सांगण्यात आले. नंतर या सर्वांनी सबंधित डॉक्‍टरचे घर गाठले व उपचाराची विनंती केली; मात्र सदर डॉक्‍टराने त्यांना त्यासाठी काही तास प्रतीक्षा करा किंवा 80 कि.मी दूर असलेल्या बराण जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला.

हे कुटुंब तेथे थांबून रुग्णवाहिका उपलब्ध होण्याची प्रतीक्षा करत होते; मात्र ती त्यांना अखेरपर्यंत मिळाली नाही. नंतर खासगी वाहनाने बराणला जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी आवश्‍यक पैसे जमा करण्यासाठी ते गावाकडे निघाले; पण रुग्णालय सोडताच चिमुकल्या सनीचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अखेर त्याच्या कुटुंबीयांना खांद्यावरूनच घरी न्यावा लागला.

संबंधितांनी हात झटकले
या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून, सदर बालकाला न्युमोनिया झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घ्यावे लागेल, असेही संबंधित डॉक्‍टरने पालकांना सांगितले होते; मात्र याकडे दुर्लक्ष करत ते बालकासह तेथून घरी निघून गेले, असा खुलासा बराणच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने केला आहे.

टॅग्स