कन्नौजमध्ये फटाका कारखान्यात स्फोट; 7 ठार

वृत्तसंस्था
रविवार, 18 जून 2017

अवैधरित्या सुरु असलेल्या या फटाका कारखान्यात आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले असून, आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

कन्नौज : उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील कांशीराम कॉलनीतील फटाका कारखान्यात आज (रविवार) सकाळी झालेल्या स्फोटात सात जण ठार, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैधरित्या सुरु असलेल्या या फटाका कारखान्यात आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटात एकाच कुटुंबातील सहा जण ठार झाले असून, आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांचा ओळख अद्याप पटलेली नाही.

घरामध्ये अवैधरित्या फटाका कारखाना सुरु करण्यात आला होता. फटाके बनविण्यात येत असताना हा स्फोट झाला. त्यामुळे बाजूच्या घरांची देखील पडझड झाली आहे.