काश्मीरमध्ये एनआयएकडून 12 ठिकाणी छापे

वृत्तसंस्था
बुधवार, 16 ऑगस्ट 2017

एनआयएकडून यापूर्वी जून-जुलैमध्येही छापे टाकण्यात आले होते. या छापेमारीत 24 जुलैला हुर्रियतच्या सात नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून टेरर फंडिंगबाबत आणखी माहिती उघड झाली आहे. हुर्रियतचे नेते सईद अली शाह गिलानी यांचा जावई अल्ताफ अहमद शाह यालाही अटक करण्यात आलेली आहे.

श्रीनगर - दहशतवाद्यांना निधी पुरविण्याच्या प्रकरणावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) आज (बुधवार) सकाळी 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांना होत असलेल्या पैशाच्या स्वरुपातील निधीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएकडून सतत छापे टाकण्यात येत आहेत. काश्मीर खोऱ्यात आज सकाळी श्रीनगर, बारामुल्ला आणि हंदवाडा येथील सुमारे 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले. श्रीनगरमधील पीरबाग आणि आलूचीबाग येथील व्यावसायिकांवर छापे टाकण्यात आले. 

एनआयएकडून यापूर्वी जून-जुलैमध्येही छापे टाकण्यात आले होते. या छापेमारीत 24 जुलैला हुर्रियतच्या सात नेत्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून टेरर फंडिंगबाबत आणखी माहिती उघड झाली आहे. हुर्रियतचे नेते सईद अली शाह गिलानी यांचा जावई अल्ताफ अहमद शाह यालाही अटक करण्यात आलेली आहे. एनआयएने 8 ऑगस्टला गिलानी यांच्या दोन मुलांसह अनेक जणांची चौकशी केली होती.