नागालँड: चकमकीत जवान हुतात्मा, 3 दहशतवादी ठार

वृत्तसंस्था
बुधवार, 7 जून 2017

या चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोधमोहिम सुरु केली आहे. पोलिस व लष्करी जवानांकडून ही मोहिम राबविण्यात येत आहे.

मोन - नागालँडमधील मोन जिल्ह्यात आज (बुधवार) सकाळी उल्फाचे दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला असून, तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी उल्फा या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला असून, तीन जवान जखमी झाले आहेत. जवानांना तीन दहशतावाद्यांना ठार मारण्यात यश आले. या चकमकीत एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.

या चकमकीनंतर जवानांनी परिसरात शोधमोहिम सुरु केली आहे. पोलिस व लष्करी जवानांकडून ही मोहिम राबविण्यात येत आहे. जखमी जवानांनी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.