टेक्सास: चर्चमध्ये अंदाधुंद गोळीबार; 26 जणांचा बळी

texas
texas

सॅन ऍटानिओ - दक्षिण टेक्सासमधील सॅन ऍटानिओ येथील एका चर्चमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी एका व्यक्तीने प्रार्थनेदरम्यान अंदाधुंद गोळीबार केल्याने 26 जणांचा बळी गेला असून, अनेक जण जखमी आहेत.

सुदरलँड स्प्रिंग्स येथील बाप्टिस्ट चर्चमध्ये एका सशस्त्र हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. प्रार्थनेसाठी जमलेल्या किमान २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला. पोलिसांनी या हल्लेखोराला ठार मारले आहे. या हल्ल्यात 20 हून अधिक नागरिक जखमी झाले असून, त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चर्चच्या परिसरात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या हल्ल्याच मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अमेरिकेत गेल्या आठवड्यात हल्ल्याची ही तिसरी घटना घडली आहे. 

हल्ला करणाऱ्याची ओळख पटली असून, डेविन केले (२६) असे त्याचे नाव आहे. टेक्सासमधील न्यू ब्रॉनफेल्स भागातील रहिवाशी असलेला डेविन स्थानिक वेळेनुसार साडेअकराच्या सुमारास चर्चमध्ये घुसला आणि त्याने बेछूट गोळीबार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com