जागतिक चौकशीला घाबरत नाही- आँग सान स्यू की

वृत्तसंस्था
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून स्यू की यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.

नेपिडो : रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रकरणी कोणत्याही आंतरराष्ट्रीय चौकशीला म्यानमार सरकार घाबरत नाही, असे वक्तव्य म्यानमारच्या प्रमुख नेत्या आँग सान स्यू की यांनी केले आहे. 

म्यानमारच्या उत्तर भागातील रखिने राज्यात अराजक परिस्थिती उदभवल्याने सुमारे चार लाखांहून अधिक रोहिंग्या मुस्लिमांना बांगलादेशात विस्थापित व्हावे लागले आहे. या प्रकरणानंतर स्यू की प्रथमच राष्ट्राला उद्देशून बोलल्या.

मुस्लिम लोक म्यानमार सोडून का जात आहेत ते मला जाणून घेण्यासाठी मला त्या लोकांशी बोलायचं आहे, असे शातंतेसाठीचा नोबेल पुरस्कार विजेत्या व नॅशनल लीग फॉर डेमॉक्रसी पक्षाच्या नेत्या आँग सान स्यू की यांनी सांगितले. 
आंतरराष्ट्रीय समुदायाकडून स्यू की यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये रोहिंग्या अतिरेक्यांवरील सशस्त्र हल्ल्यामुळे येथे हिंसाचार उसळला आहे. सुरक्षा फौजांच्या या हा प्रतिसाद म्हणजे वांशिक हल्ला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.