रॅन्समवेअरचा पुन्हा हल्ला

वृत्तसंस्था
बुधवार, 28 जून 2017

कीव्ह (युक्रेन) - संपूर्ण युरोपाला आज पुन्हा सायबर हल्ल्यांना सामोरे जावे लागले. या हल्ल्यामुळे बॅंका, वीज कंपन्या आणि सरकारी कार्यालयांना फटका बसला. या हल्ल्याचा सर्वाधिक फटका युक्रेनला बसला आहे. भारताला मात्र या हल्ल्याची झळ अद्याप बसली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

काही महिन्यांपूर्वी झालेल्या हल्ल्याप्रमाणेच हा रॅन्समवेअरचा हल्ला असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. युक्रेनशिवाय रशिया आणि इग्लंडमध्येही अनेक संगणक यंत्रणा या रॅन्समवेअरमुळे ठप्प झाल्या आहेत. 

सायबर हल्ल्यामुळे आमची संगणक यंत्रणा ठप्प झाली आहे, असे ‘डब्ल्यूपीपी’ या जगातील सर्वात मोठ्या जाहिरात कंपनीने स्पष्ट केले. एवढेच नव्हे तर तेलनिर्मात्या ‘रोसनेफ्ट’ या कंपनीनेही सायबर हल्ल्याचा फटका बसल्याचे सांगितले. 

‘डब्ल्यूपीपी’च्या अनेक कंपन्यांतील बऱ्याच यंत्रणा या हल्ल्यामुळे ठप्प झाल्या आहेत. हल्ल्याचा नेमका परिणाम किती झाला आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

युक्रेनच्या विमानतळालाही या सायबर हल्ल्याचा फटका बसला असून, बॅंकांनाही त्याची झळ पोचल्याचा दावा करण्यात येत आहे. 

युक्रेनचे उपपंतप्रधान पावलो रोझेन्को यांनी सायबर हल्ला झाल्याचे मान्य केले. हल्ला झालेल्या संगणकांची छायाचित्रेच त्यांनी ट्विटरवरून शेअर केली. नॉर्वेलाही सायबर हल्ल्याचा फटका बसला आहे.

नेदरलॅंडमधील कंपन्यांनाचे कामकाजही रॅन्समवेअरमुळे ठप्प झाले आहे. एपीएम या कंपनीतर्फे चालविण्यात येणाऱ्या १७ गोदींवरील कामकाज थंडावले आहे.

फटका बसलेल्या काही कंपन्या
रोसनेफ्ट (रशियातील तेल कंपनी), एपीएम (डेन्मार्कची जहाज कंपनी), डब्लूपीपी (ब्रिटनमधील जगविख्यात जाहिरात कंपनी), मर्क अँड को (अमेरिकेतील औषध निर्माण कंपनी), सेंट गोबेन (फ्रान्स), डॉइश पोस्ट (जर्मनीतील लॉजिस्टिक कंपनी), मेट्रो (जर्मनीतील होलसेल स्टोअर), इव्हराज (रशियातील स्टील कंपनी), युक्रेनमधील बॅंका व विमानतळ.

ग्लोबल

नॅपिडॉ : लष्कराबाबत सौम्य धोरण अवलंबिले असल्याचा आरोप म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांनी फेटाळून लावला....

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

नोकऱ्यांबाबत काँग्रेस ठरलेले अपयशी, मोदी तर निष्क्रिय: राहुल गांधी न्यूयॉर्क : असहिष्णुता आणि बेरोजगारी ही सध्या भारताच्या...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मेक्सिको सिटी : मेक्सिकोच्या मध्यवर्ती भागात झालेल्या मोठ्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला असून, यामध्ये सुमारे दीडशे लोक...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017