सलाहुद्दीनला ठरविले जागतिक दहशतवादी 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 जून 2017

मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेदरम्यान दहशतवादाचा आणि पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा असल्याबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सलाहुद्दीनला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले.

वॉशिंग्टन - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीच्या काही तास आधी अमेरिकेने आज हिज्बुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्‍या महंमद युसूफ शहा उर्फ सईद सलाहुद्दीन याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले.

मोदी आणि ट्रम्प यांच्या चर्चेदरम्यान दहशतवादाचा आणि पाकिस्तानचा दहशतवादाला पाठिंबा असल्याबाबत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सलाहुद्दीनला जागतिक दहशतवादी म्हणून जाहीर केले. हिज्बुल मुजाहिदीन ही संघटना पाकिस्तानमधून कारवाया करते.

पंतप्रधान मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन आणि संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांची स्वतंत्रपणे भेट घेत चर्चा केली.