चीनमध्ये "माळीण'सदृश शोकांतिका; 100 मृत्युमुखी

वृत्तसंस्था
शनिवार, 24 जून 2017

हे भूस्खलन इतके मोठे होते; की यामुळे येथील एका नदीच्या दोन किलोमीटर अंतराच्या प्रवाहास अवरोध उत्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गावातील किमान 40 घरांवर दरड कोसळल्याचे निष्पन्न झाले आहे

बीजिंग - नैऋत्य चीनमधील सिचुआन प्रांतातील माओ काऊंटीतील शिन्मो या गावामध्ये कोसळलेल्या दरडीखाली सुमारे 100 नागरिक गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

हे भूस्खलन इतके मोठे होते; की यामुळे येथील एका नदीच्या दोन किलोमीटर अंतराच्या प्रवाहास अवरोध उत्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. गावातील किमान 40 घरांवर दरड कोसळल्याचे निष्पन्न झाले आहे. या दुदैवी गावावर सुमारे 30 लाख क्‍युबिक मीटर (10.5 कोटी घनफूट) दरड कोसळल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या ठिकाणी तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. येथे पाऊसही सुरु झाला असून तो सतत काही दिवस सुरु राहण्याची भीती आहे.

टॅग्स