राणेंसाठी माझे खाते देण्यास तयार : चंद्रकांत पाटील

अमोल टेंबकर
रविवार, 20 ऑगस्ट 2017

राणे यांच्यासाठी माझे सार्वजनिक बांधकाम खाते द्यायची वेळ आल्यास ते मी कधीही देण्यास तयार आहे. तर यापुर्वी हे खाते आपल्याला नको असे मी पक्षाला सांगितले होते.

सावंतवाडी : नारायण राणे यांच्या प्रवेशाचा मुहूर्त अद्याप पर्यत ठरलेला नाही. त्यांनी पक्षात याव त्यांचे आम्ही स्वागत करू. त्याच्याबाबत थेट केंद्रातून अमित शहा निर्णय घेत आहेत. ते माजी मुख्यमंत्री असल्यामुळे ते आले तर नक्कीच फायदा होईल, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा भाजपाचे नेते चद्रकांतदादा पाटील यांनी आज (रविवार) येथे केले

ते आज जिल्हा दौ-यावर आहेत. सावंतवाडी पर्णकुटी विश्रामगृहावर थांबले असता ते बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, संदेश पारकर, अतुल काळसेकर, महेश सारंग दत्ता कोळमेकर आदी उपस्थित होते

चंद्रकांत पाटील म्हणाले, की राणे यांच्यासाठी माझे सार्वजनिक बांधकाम खाते द्यायची वेळ आल्यास ते मी कधीही देण्यास तयार आहे. तर यापुर्वी हे खाते आपल्याला नको असे मी पक्षाला सांगितले होते. त्यांच्याबाबतचा सर्वस्वी निर्णय वरिष्ठ स्तरावर घेण्यात येत आहे.