क्रिकेट 'बुकींना' कोण पाठीशी घालतंय : नितेश राणे

सुचिता रहाटे
गुरुवार, 13 जुलै 2017

मुंबई : चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारत- पाकिस्तान दरम्यान झालेल्या अंतिम सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर हा सामना 'फिक्स' झाल्याचा आरोप अनेकांनी केला. पण, आता यामध्ये काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली असून, भारताचे अनेक सामने फिक्स असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विशाल कारिया हा मुंबईतला व्यावसायिक असून क्रिकेट मॅच फिक्सिंग मध्ये त्याचा हात असल्याचे बोलले जात आहे. यासंबंधी अंमलबजावणी संचालयनाला पत्र देखील लिहिले असल्याचे नितेश राणे यांनी 'सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले.

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभव झाल्यानंतर अनेक ठिकाणी फिक्सिंगच्या चर्चेला उत आला होता. तर, भारत-पाकिस्तान सामन्यानंतर चौकशी करण्याची मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली होती. या सर्व गोष्टींमध्ये सोशल मीडियावर मुंबईतील विकास कारिया या व्यवसायिकाच्या नावाची चांगलीच चर्चा होती. कारिया याचे नाव चर्चेत आल्याने प्रकरणाला नवे वळण आले आहे. कारियाची चौकशी व्हावी तसेच पोलीस त्याच्यावर इतकी मेहरबानी का दाखवत आहे, असा सवाल त्यांनी केला. सोशल मीडियावर फिरत असलेल्या माहितीची चौकशी व्हावी, अशी मागणी सुध्दा राणे यांनी केली आहे.

सोशल मिडियावर मॅच फिक्सिंगसंदर्भात एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यात 'विशाल कारिया' या मुंबईतील व्यवसायिकाचा उल्लेख केला आहे. संबंधित मेसेज संदर्भात विशाल कारिया ची एक 'ऑडिओ क्लिप' सुध्दा व्हायरल झाली. त्यात त्याने असे म्हटले की, विशालचे महेंद्रसिंग धोनी, हरभजन सिंग ( मैत्री किंवा फायद्यासाठी मैत्री) यांसारख्या खेळाडूंशी चांगली मैत्री आहे. मुंबईसह अनेक प्रमुख शहरांमध्ये त्याची मालमत्ता आहे. तो आणि दुबई येथे स्थायिक असलेला त्याचा साथीदार हितेश संघवी हे दोघेही मॅच फिक्सिंगच्या व्यवसायात यापुर्वीपासून आहेत. आपल्या आरामदायी आयुष्यासाठी नावाजलेल्या या दोघांचे अनेक राजकारण्यांशी चांगले संबंध देखील आहेत आणि सर्वांना त्यांच्या मॅच फिक्सिंगच्या कौशल्याची चांगली जाण आहे.