निर्मला उपांत्य फेरीत

पीटीआय
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

लंडन - भारताच्या निर्मला शेरॉन हिने महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत उपांत्य फेरी गाठली. तिने पराभूत धावपटूंमध्ये सर्वोत्तम ५२.०१ सेकंद वेळ दिली. 

शर्यतीच्या झालेल्या तीन हिटपैकी तिसऱ्या हिटमध्ये निर्मलाने चौथे स्थान मिळविले. प्रत्येक फेरीतील पहिल्या तिघी धावपटू उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्या. उर्वरित धावपटूंपैकी वेगवान वेळ नोंदविणाऱ्या सहा धावपटूंनाही उपांत्य फेरीत स्थान देण्यात आले. यात निर्मलाचा समावेश आहे. 

महंमद अनस, द्युती चंद अपयशी ठरल्यानंतर निर्मलाने मिळविलेले यश भारतीयांना समाधान देणारे ठरले. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरुषांच्या ११० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सिद्धांत थंगलियानेही निराशा केली. तो सातव्या स्थानावर आला. जागतिक स्पर्धेच्या तयारीसाठी परदेशात सराव करणाऱ्या सिद्धांतला १३.६४ सेकंद अशीच वेळ देता आली. 

पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये भारताचा गोपी थोनाकल २८व्या स्थानावर आला. त्याने २ तास १७.१३ सेकंद अशी वेळ दिली. महिलांच्या मॅरेथॉनमध्ये भारताची मोनिका आठारे ९२ स्पधर्कांत ६४वी आली. तिने २ तास ४९ मिनिट ६४ सेकंद अशी वेळ दिली. पहिल्या २५ किलोमीटरपर्यंत ती ४६व्या स्थानावर होती.

टॅग्स