कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्या ‘बिन बुलाए मेहमान’

पीटीआय
बुधवार, 7 जून 2017

लंडन - विराट कोहली फाउंडेशनच्या सोमवारी (ता. ५) लंडनमध्ये झालेल्या भव्य कार्यक्रमात आजी-माजी खेळाडू उपस्थित होते; पण या पाहुण्यांमध्ये भारतीय बॅंकांची अब्जावधी रुपयांची कर्जे बुडवणारा विजय मल्ल्या बिन बुलाये मेहनमानसारखा उपस्थित राहिला आणि सर्व खेळाडूंची तारांबळ उडाली. मल्ल्यापासून चार हात दूर राहणेच सर्व खेळाडूंनी पसंत केले.

भारतीय बॅंकांची कर्जे बुडवून लंडनमध्ये फरारी झालेल्या मल्ल्याच्या नावाने भारतात चीड व्यक्त होत आहे; मात्र रविवारी झालेल्या भारत-पाकिस्तान सामन्यात मल्ल्याची उपस्थिती भुवया उंचावणारी होती. भारत सरकारकडून मल्ल्याला भारतात आणण्यासाठी राजनैतिक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. आयपीएलमध्ये विराट कोहली कर्णधार आहे, त्या बंगळूर संघाची मालकी असलेल्या रॉयल चॅलेंजर्सचा मल्ल्या भारतातून पळ काढण्यापूर्वी सर्वेसर्वा होता.

कोहली फाउंडेशनच्या कार्यक्रमात मल्ल्याला पाहून सर्वच जण आश्‍चर्यचकित झाले. त्यामुळे सर्वच जण अस्वस्थ झाले, असे या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.  

कोहली फाउंडेशनकडून मल्ल्याला निमंत्रण देण्यात आले नव्हते. अशा चॅरिटी डिनरला ज्या निमंत्रितांनी आपली उपस्थिती निश्‍चित केलेली असते, असे पाहुणे त्यांच्या ओळखीपैकी कोणालाही निमंत्रित करू शकतात. अशा प्रकारेच कोणी तरी मल्ल्याला बोलवले असेल, असा खुलासा बीसीसीआयच्या उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आला. खेळाडूंसाठी ही अडचणीची परिस्थिती होती. त्याला कार्यक्रमातून बाहेर जा, असे सांगणे कठीण होते. त्यामुळे खेळाडूंनीच त्याच्यापासून दूर राहत डिनरमधून लवकर काढता पाय घेतला, अशी माहितीही या सूत्रांनी दिली.