पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा; महिलेला विवस्त्र करून मारहाण (व्हिडिओ)

nagar
nagar

नगर : श्रीगोंदे तालुक्यात माणगावमध्ये पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याची घटना घडली असून, आदिवासी महिलेला सवर्णांकडून विवस्त्र करून मारहाण झाल्याची समोर आले आहे. या प्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही.

भाणगावमध्ये 12 सप्टेंबरला दुपारी तीनच्या सुमारास आदिवासी कुटुंबाकडून पाळण्यात आलेली शेळी शेतात घुसल्याने हे कृत्य करण्यात आले. वागस्कर या कुटुंबाने या आदिवासी कुटुंबातील पुरुषाला मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी पतीला वाचवायला गेलेल्या महिलेला या कुटुंबाकडून विवस्त्र करण्यात आले व मारहाण करण्यात आली. यावेळी या कुटुंबाकडून मदतीची याचना करण्यात येत होती. पण, त्यांना कोणीही मदत केली नाही.

अखेर या महिलेने न्यायासाठीश्रीगोंदा पोलिस ठाणे गाठले. पण, तेथे दखल न घेतल्याने अखेर ते कर्जत पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली. पण, पोलिसांना एकाही आरोपीला अटक करण्यात यश आले नाही. अखेर आरोपींनी न्यायालयातून जामीन मिळविल्याचे समोर आले आहे. अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपींना जामीन कसा मिळाला, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण झाले आहेत.

पुरोगामी महाराष्ट्रात महिलेला विवस्त्र करून मारहाण करणे आणि जातीवाचक शिवीगाळ करणे ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com