'बुलेट ट्रेनचा विरोध प्रभूंच्या अंगाशी'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - बुलेट ट्रेन भारतासारख्या देशात अव्यवहार्य आहे, अशी भूमिका मांडत बुलेट ट्रेनला विरोध दर्शविल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरेश प्रभू यांना रेल्वेमंत्रिपदावरून दूर करत त्याजागी आपल्या मर्जीतील पियुष गोयल यांना रेल्वेमंत्री केले. त्यानंतर आठच दिवसांत बुलेट ट्रेनच्या कामाचे भूमिपूजन झाले, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली.   

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘पंतप्रधानांनी मुंबईचे महत्त्व कमी होण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटरसह अनेक प्रकल्प गुजरातला नेले. तब्बल एक लाख १० हजार कोटी खर्चून सुरू होणाऱ्या बुलेट ट्रेनचा सामान्यांना फायदा नाही. बुलेट ट्रेनचा निर्णय अव्यवहार्य वाटत आहे. जगात कोठेही बुलेट ट्रेन फायद्यात चालत नाही. त्यामुळे सरकारला त्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावे लागणार आहे. त्याच्या स्टेशनसाठी मुंबईचे आर्थिक केंद्र पंतप्रधानांनी गुजरातला नेले. त्यामुळे बुलेट ट्रेनबाबत सरकारने स्पष्टीकरण देणे आवश्‍यक आहे. हा प्रकल्प व्हावा की नाही, याबाबत जनमत चाचणी घेणे आवश्‍यक आहे. बुलेट ट्रेन नफ्यात चालणार नाही, असे रेल्वेमंत्री असताना सुरेश प्रभू सांगत होते. मात्र, पंतप्रधानांना व्यक्तिगत प्रेस्टीजसाठी ती हवी होती. त्यामुळेच त्यांना रेल्वे मंत्रिपदापासून दूर केले.’’ 

बुलेट ट्रेन करण्यापेक्षा त्या पैशातून शेतकऱ्यांची कर्जमाफी, रखडलेले जलसिंचन प्रकल्प मार्गी लावण्याबरोबरच रेल्वचे जुने झालेले इन्फ्रास्ट्रक्‍चर सुधारावे. त्यातून लोकांचे प्रश्‍न मार्गी लागतील. बुलेट ट्रेनच्या खर्चासाठी कऱ्हाड-चिपळूण लोहमार्ग होणार नसेल, तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही.,’’ असेही त्यांनी नमूद केले.

पृथ्वीराज म्हणाले...
सरकारची कर्जमाफी योजना पूर्ण फसली 
कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची गरजच काय?
विरोधकांच्या आक्रमकतेमुळेच महेता, देसाईंच्या चौकशीचे आदेश
भाजपकडे सरकार चालवण्याची क्षमता असलेले खासदारच नाहीत