मुख्यमंत्री फडणवीस स्वीडनच्या दौऱ्यावर 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 ऑक्टोबर 2017

मुंबई - स्वीडनमध्ये होत असलेल्या व्यावसायिक आणि औद्योगिक प्रदर्शनास उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पहाटे रवाना झाले असून, या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते "मेक इन इंडिया' अभियानांतर्गत राज्यातील गुंतवणुकीसाठी विविध उद्योग समूहांबरोबर चर्चा करणार आहेत. 

"स्वीडन एक्‍स्पो-2017' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वपूर्ण उपक्रमात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. या शिष्टमंडळात राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुख्य सचिव सुमीत मलिक आदींचा समावेश आहे. या दौऱ्यादरम्यान राज्यात मोठ्या प्रमाणावर परकी गुंतवणूक व्हावी, यासाठी मुख्यमंत्री जागतिक पातळीवरील विविध महत्त्वाच्या उद्योग समूहांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. याशिवाय स्वीडनचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री, वाणिज्य आणि व्यापारमंत्री यासोबतच विविध क्षेत्रांतील इतर मान्यवरांच्या भेटी ते घेणार आहेत.