कोपर्डी प्रकरणातील गुन्हेगारांना नेमकी काय शिक्षा झाली?

Ujjawal_Nikam
Ujjawal_Nikam

देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार खून प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने आज (बुधवार) खून व बलात्कार करण्याच्या कटाखाली फाशीची शिक्षा सुनावली. 

या निकालाबाबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला पीडित मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी कलम 109 अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी, बलात्कार केल्याप्रकरणी कलम 376 (2) अंतर्गत जन्मठेप आणि वीस हजारांचा दंड व कलम 302 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 

तसेच, आरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांना बलात्काराचा कट रचणे तसेच आरोपी जितेंद्र शिंदेला बलात्कारासाठी उद्यूक्त करणे यासाठी दोघांनाही जन्मठेप आणि वीस हजारांचा दंड आणि कलम 309 अंतर्गत फाशीची शिक्षा देण्यात आली आहे. 

वेळोवेळी खटल्याचे काम तहकुब करण्यासाठी आरोपी क्रमांक दोनला म्हणजेच संतोष भवाळला 18 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून हा दंड नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महसूलची थकबाकी म्हणून वसूल करावा, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. ही रक्कम भरली नाही तर तीन महिन्यांची अधिक शिक्षा त्याला ठोठावण्यात येणार आहे.

तसेच आरोपींना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार असल्याचेही उज्ज्वल निकम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com