माझ्या छकुलीला न्याय मिळाला: पीडितेची आई

kopardi
kopardi

नगर - माझ्या मुलीचा बलात्कार करून खून करणाऱ्या दोषींना फाशीची शिक्षा झाल्याने मी सर्व महाराष्ट्राचे आभार मानते. अखेर माझ्या छकुलीला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईने व्यक्त केली आहे.

देशभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार, खून प्रकरणातील तिन्ही आरोपींना जिल्हा न्यायालयाने आज (बुधवार) फाशीची शिक्षा सुनावली. शाळकरी मुलीवर बलात्कारानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या मुलीच्या न्यायासाठी मराठा क्रांती मूक मोर्चे निघाले होते. त्यामुळे, या निकालाकडे देशाचे लक्ष होते. 

आज लागलेल्या निकालानंतर भावूक झालेल्या पीडितेच्या आईने सांगितले, की या खटल्यातील सरकारी वकील उज्ज्वल निकम, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भय्यूजी महाराज आणि मराठा समाजाचे मी आभार मानते. यापुढे कोणत्याही मुलीवर असा अन्याय होऊ देऊ नका. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास होता. तपास अधिकारी, पोलिस अधिकारी यांनी मनापासून तपास केला आणि माझ्या छकुलीला न्याय मिळाला. प्रत्येक शनिवारी मला माझ्या छकुलीची आठवण येते
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com