श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज घेतला मागे

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

मुंबई - परदेशात शिक्षण घेण्यासाठी असलेल्या शिष्यवृत्तीवरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या कन्या श्रुती बडोले यांनी शिष्यवृत्ती अर्ज मागे घेत असल्याचे जाहीर केले.

बडोले यांच्या घोषणेमुळे सामाजिक न्याय विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांचे चिरंजिव आंतरिक्ष वाघमारे हे शिष्यवृत्ती अर्ज मागे घेणार का? याकडे लक्ष वेधले जात आहे.

बडोले म्हणाल्या की, मी आयआयटी मद्रासमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्या वेळी माझे वडील मंत्री नव्हते. अस्ट्रो फिजिक्‍स या विषयात जगातल्या पहिल्या 26 व्या क्रमांकावर असलेल्या विद्यापीठात माझी गुणवत्तेनुसार निवड झाली होती. मला यापूर्वी गुणवत्तेनुसार विदेशातल्या विद्यापीठांनी शिष्यवृत्ती दिली; पण पीएचडीसाठी या विद्यापीठात शिष्यवृत्तीची सवलत नाही. माझी निवड झाल्याने मी राज्य सरकारकडे शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला होता. मात्र, त्यामुळे वादंग निर्माण झाल्याने हा अर्ज मी मागे घेत आहे.

"पीएचडी इन सायन्स'साठी राज्य सरकार तीन जणांना शिष्यवृत्ती देते. यासाठी केवळ दोन अर्ज आले असून, एक जागा अजूनही रिक्त आहे, असेही बडोले यांनी सांगितले.