राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे  यांचे निधन

मुंबई - विधान परिषदेचे माजी सभापती, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे (वय 67) यांचे गुरुवारी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वासू सहकारी असलेले डावखरे यांचे सर्व पक्षांतील नेत्यांशी स्नेहाचे संबंध होते. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. 

नगरसेवक असताना शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात त्यांनी कॉंग्रेसला महापौरपद मिळवून देण्याची किमया करून दाखवली होती. आपल्या अंगभूत गुणांमुळे, तसेच सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडण्याच्या हातोटीमुळे त्यांनी राजकारणात अल्प काळात प्रगती केली. त्यांच्या पश्‍चात आमदार निरंजन डावखरे व प्रबोध हे पुत्र, सून व नातवंडे असा परिवार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com