#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc Anti Tank Missile
sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc Anti Tank Missile
Updated on

नाग हे संपूर्णत: स्वदेशी बनावटीचे ए टी एम म्हणजे "अँटी टॅंक मिसाईल' (क्षेपणास्र) आहे. तिसऱ्या पिढीचे रणगाडा विरोधी नाग हे गाईडेड क्षेपणास्र 4 कि.मी. अंतराच्या परिसरात असलेल्या शत्रूच्या रणगाड्यावर अचूकपणे आदळून त्याचा विध्वंस करू शकते. याला HET असेही म्हणतात. HET हे हाय एक्‍सप्लोसिव्ह अँटी टॅंक मिसाईलचे संक्षिप्त रूप आहे. नाग क्षेपणास्राचे आवरण फायबर ग्लासचे आहे. त्याचे वजन सुमारे 42 किलोग्रॅम आहे. 

महाराष्ट्रातील अहमदनगर येथून नाग क्षेपणास्राच्या आत्तापर्यंत अनेक यशस्वी चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे राजस्थानातील महाराजा फिल्ड फायरिंग रेंज येथेही रात्रीच्या अंधारात अचूक यशस्वी चाचण्या घेतलेल्या आहेत. तसेच उन्हाळ्यात आणि थंडीच्या दिवसांतही चाचणी घेतली जाते. 15 जानेवारी 2016 रोजी रात्री राजस्थानात नाग क्षेपणास्राची चाचणी घेण्यात आली होती. या साठी खास असे थर्मल टार्गेट सिस्टिम (टी टी एस) नामक नकली लक्ष्य लागते. त्याची जडणघडण संरक्षण खात्याच्या जोधपूर येथील प्रयोगशाळेत (डी. आर डी. एल.) मध्ये केली होती. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे रणगाडा स्थिर असला किंवा चालत असला तरीही नाग क्षेपणास्र अचूक वेध घेते. 

नाग क्षेपणास्र वापरण्यासाठी आता वजनाने हलक्‍या असलेल्या ए. एल.एच. (एडव्हान्स्ड लाईट हेलिकॉप्टर) हेलिकॉप्टरचा उपयोग करण्याचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. त्याचे नाव ध्रुव असून ते हिंदुस्थान एरोनॉटिक्‍स लि. (एच. ए. एल.) यांनी तयार केलंय. नाग क्षेपणास्र सोडताना जेव्हा ध्रुव हेलिकॉप्टरचा उपयोग करतात तेव्हा हेलिना (HelinA) असा शब्दप्रयोग केला जातो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police Transfers : राज्यातील आयपीएस पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
Property card for flat owners
Tejasvi Satpute and Sanjay Darade
ola uber rapido
Marathi News Esakal
www.esakal.com