#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

टीम ई सकाळ
शुक्रवार, 2 जून 2017

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यादरम्यान पणजी येथे झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान दि. 15 ऑक्‍टोबर 2016 रोजी विविध क्षेत्रातील एकूण 16 करार करण्यात आले. 

यामध्ये संरक्षण, पायाभूत सुविधा, ऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, नौका बांधणी इ. विविध क्षेत्रांमधील करारांचा समावेश असून गोवा येथे आयोजित करण्यात आलेल्या 17 व्या भारत - रशिया द्विपक्षीय परिषदे दरम्यान हे करार करण्यात आले. 

या करारांविषयी अधिक माहिती पुढीलप्रमाणे: 

  • आंतरराष्ट्रीय माहितीच्या सुरक्षेबाबतचा करार करण्यात आला आहे. 
  • द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक क्षेत्रातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करार.
  • का-226 टी (Ka-226 T) या हेलिकॉप्टरचे भारतामध्ये उत्पादन सुरू करण्यासाठीचा संयुक्त उपक्रम (Joint Venture) स्थापन करण्यासाठी करार. 
  • आंध्र प्रदेश आणि हरियाणामध्ये स्मार्ट शहरांचा विकास करणे आणि वाहतूक व्यवस्थांचा विकास करण्यासाठी सामंजस्य करार 
  • इंजिनियर्स इंडिया लिमिटेड आणि रशियाच्या 'गॅझप्रॉम (Gazprom) या कंपन्यांमध्ये भारत व रशियादरम्यान वायूवाहिनीचा विकास करण्यासाठी सामंजस्य करार. 
  • 'रॉसनेफ्ट ऑईल कंपनी' (Rosneft Oil Company) आणि ओ.एन.जी.सी. विदेश लिमिटेड या कंपन्यादरम्यान शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रातील सहकार्यासाठीचा सामंजस्य करार. 
  • भारताच्या 'राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधी' आणि रशियाच्या 'रशियन डायरेक्‍ट इन्व्हेस्टमेंट फंड' यांच्या दरम्यान 1 अब्ज अमेरिकी डॉलरचा निधी उभारण्यासाठी सामंजस्य करार. 
  • नागपूर - हैदराबाद दरम्यानच्या रेल्वेचा वेग वाढविण्यासाठी भारतीय रेल्वे आणि रशियन रेल्वेदरम्यान सामंजस्य करार. 
  • रशियन अंतराळ संशोधन संस्था 'रॉसकॉसमॉस' (Roscosmos) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रो यांदरम्यान 'नाविक' आणि 'ग्लोनास' या दिशादर्शक प्रणालीकडील माहितीच्या अदानप्रदानासाठीचा सामंजस्य करार.
  • 'ब्राह्मोस' हे भारत आणि रशियाने संयुक्तपणे तयार केलेले सुपरसोनिक क्षेपणास्त्र असून या क्षेपणास्त्राचा पल्ला 290 किमी वरून 600 किमीपर्यंत वाढविण्याचा निर्णय दोन्ही देशांनी ऑक्‍टोबर 2016 मध्ये घेतला आहे.