बीड: सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात तिघांचा मृत्यू

जगदीश बेदरे
बुधवार, 6 सप्टेंबर 2017

हा अपघातात एवढा भयंकर होता, की इंडीका गाडी यात चक्काचुर झाली. अपघातातील दोन मयत तालुक्यातील हिरापुर व एक जण तालुक्यातील टाकळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.

गेवराई (जि. बीड) : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील रांजणी फाट्याजवळ आज (बुधवार) पहाटे दोनच्या दरम्यान इंडीका व ट्रकचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिका आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला. तर, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघातानंतर तात्काळ पोलिसांनी सर्वांना बीड येथील जिल्हा रूग्णालयात नेले होते.

हा अपघातात एवढा भयंकर होता, की इंडीका गाडी यात चक्काचुर झाली. अपघातातील दोन मयत तालुक्यातील हिरापुर व एक जण तालुक्यातील टाकळगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.