आष्टीत स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

सर्दी, तापाचा त्रास होऊ लागल्याने संबंधित रुग्णाला ३ सप्टेंबर रोजी आष्टी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अधिक त्रास जाणवू लागल्याने संबंधित रुग्णाला गुरुवारी अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

आष्टी (जि. बीड) : शहरातील 50 वर्षीय पुरुषाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला.

सर्दी, तापाचा त्रास होऊ लागल्याने संबंधित रुग्णाला ३ सप्टेंबर रोजी आष्टी येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. अधिक त्रास जाणवू लागल्याने संबंधित रुग्णाला गुरुवारी अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.

त्याच दिवशी घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले. शुक्रवारी रात्री स्वाईन फ्लू झाला असल्याचा अहवाल आल्याने त्यांना नगर येथून पुणे येथे उपचारासाठी नेत असताना संबंधित रूग्णाचा रस्त्यातच निधन झाले.