माजलगाव: माजी उपनगराध्यक्षांच्या घरी चोरी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ठसे तज्ज्ञास पाचारण करण्यात आले आहे. या घटनेत रामराव रांजवन यांच्या हाताला जखमी झाली आहे.

माजलगाव : शहरातील पाटील गल्ली भागातील माजी उपनगराध्यक्ष रामराव रांजवन यांच्या घरी पाच ते सहा अज्ञात चोरत्यानी धारदार शस्त्राने हल्ले करत कपाटातील सोन्या चांदीच्या दागिन्या सह रोकड पळवल्याची घटना आज (गुरुवारी) पहाटे तीन वाजता घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, रामरा रांजवन यांच्या घराच्या गेट चे कुलूप तोडून आत प्रवेश केला रांजवन यांच्या वर चाकूने हल्ला करत त्यांनी कपाटातील सोन्या चांदीचे पारंपारिक दागिने रोकड रक्कम पळवली, तीन  चोरटे घरात होते तर तीन चोरटे बाहेर होते मोबाइल वर चोरटे लोकेशन घेत होते जलदी चलो बाहर से साब का फोन आ रहा हैं, चूप बैठो, खतम करेंगे, असे हिंदीत चोरटे समभाषण करत होते.

दरम्यान पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून ठसे तज्ज्ञास पाचारण करण्यात आले आहे. या घटनेत रामराव रांजवन यांच्या हाताला जखमी झाली आहे.

Web Title: Beed news thief in majalgaon