गेवराईत सशस्त्र दरोड्यात पती-पत्नी ठार, दोन मुली गंभीर

जगदीश बेदरे
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

गेवराई (जि. बीड) - भवानी अर्बन को ऑप बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे यांच्या घरावर बुधवारी पहाटे   सशस्त्र दरोडा धुमाकूळ घातला. या दरोड्यात दरोडेखोरानी घाडगे पती-पत्नीची क्रूर हत्या केली असुन दोन्ही  मुलींनाही धारदार शस्ञाने बेदम मारहाण करून  लाखोंचा ऐवज लंपास करत पाबोरा केला . दरम्यान या  घटनेमुळे गेवराई तालुका  हादरला आहे. 

गेवराई शहरातील सरस्वती काॅलनीत गेल्या  अनेक वर्षापासून भवानी अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेच्या मुख्य शाखेतील प्रमुख वसुली अधिकारी तथा वरिष्ठ व्यवस्थापक आदिनाथ उत्तमराव घाडगे (वय-50) राहतात. त्यांच्या घरी ता. 23 रोजी पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजा वाजला असता घाडगे यांच्या पत्नी अलका( 42) यांनी दरवाजा उघडल्यानंतर दरोडेखोरांनी धारदार शस्ञानी त्याच्यावर हल्ला चढवला.  यानंतर आदीनाथ घाडगे ,  तसेच घरात असलेली बाळंतपणासाठी आलेली मुलगी वर्षा संदीप जाधव ( 22) व स्वाती घाडगे( 18 ) या दोन्ही मुलींवरही धारदार शस्ञाने हल्ला केला. यात वर्षाची  प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही मुलींना जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ  हलविण्यात आले आहे.   दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत आदीनाथ घाडगे व अलका घाडगे या पती पत्नीचा मृत्यू झाला आहे.  

दरम्यान, लाखोंचा ऐवज दरोडेखोरांनी लुटला आहे . सकाळी घटनास्थळी पोलिसांनी दाखल झाले आहेत प्राथमिक पंचनामा सुरू  होता. दरम्यान काही वेळात पोलिस अधीक्षक श्रीधर हे घटनास्थळी दाखल होणार आहेत.