लातूर जिल्ह्यात एटीएसचे छापासत्र; टेलिफोन एक्‍सेंजचा अड्डा उद्ध्वस्त

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

देशातील दहशवादी कारवायांच्या अनुषंगाने एटीएसच्या पथकांनी गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवला होता. एटीएसच्या औरंगाबाद व नांदेड येथील पथकांनी लातूर जिल्हा पोलिस आणि दूरसंचार विभागाचे अधिकाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी (ता. सोळा) येथील प्रकाशनगर आणि जिल्ह्यातील वालनवाडी येथे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

औरंगाबाद - जम्मू-काश्‍मीरच्या लष्करी गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनंतर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) लातूर पोलिसांच्या मदतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यात बनावट टेलिफोन एक्‍चेंज उद्ध्वस्त करण्यात आले असून, दोघांना अटक केल्याची माहिती सुत्रांनी दिली. या बनावट एक्‍सेंजने कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.

देशातील दहशवादी कारवायांच्या अनुषंगाने एटीएसच्या पथकांनी गेल्या काही महिन्यांपासून लातूर जिल्ह्यामध्ये लक्ष ठेवला होता. एटीएसच्या औरंगाबाद व नांदेड येथील पथकांनी लातूर जिल्हा पोलिस आणि दूरसंचार विभागाचे अधिकाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी (ता. सोळा) येथील प्रकाशनगर आणि जिल्ह्यातील वालनवाडी येथे ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

पहिल्या कारवाईत 96 सीमकार्ड तर दुसऱ्या कारवाईत 14 सीमकार्ड जप्त करण्यात आले. या कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. बोगस कॉलसेंटर्सच्या माध्यमातून लोकल मोबाइल क्रमांकाच्या माध्यमाने बेकायदा पद्धतीने आंतरराष्ट्रीय कॉल्स हाताळण्यात येत होते. आंतरराष्ट्रीय कॉल अनधिकृत पद्धतीने (ठराविक तंत्रज्ञान वापरुन) लोकल लाइनवर वळवायचे असा हा बोगस कारभार सुरू होता. बनावट एक्‍स्चेंजच्या माध्यमाने कॉल्सचा वापर गुप्तचर यंत्रणेकडून शेजारी देशांशी संपर्क साधताना लष्करासंबंधीची अतिमहत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी या बनावट यंत्रणेचा वापर केल्याचा गुप्तचर यंत्रणेला संशय होता.

या कारवाईत दोन बेकायदेशीर आंतरराष्ट्रीय गेटवे, तसेच तीन ट्रान्सफॉर्मींग मशिन व इलेक्‍ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. या बनावट यंत्रणेमुळे दूरसंचार विभागाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. संपुर्ण यंत्रणेचा दहशवादी कारवायांसाठी वापर केला जात असल्यच्या संशयाच्या अनुषंगाने तपास करण्यात येत असल्याचे सुत्रांनी सांगितले.