उस्मानाबाद जिल्ह्यात पावसाची संततधार

राजेंद्र जाधव
रविवार, 20 ऑगस्ट 2017

उस्मानाबाद, वाशी, भूम तालुक्यांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ४२ पैकी १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १३३ मिलीमीटर पाऊस उस्मानाबाद शहरात नोंदला गेला आहे. गेल्या दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) रात्रीपासून सर्वदूर पाऊस झाला.

उस्मानाबाद : जिल्ह्यात गेल्या १४ तासांपासून संततधार पाऊस सुरू आहे. सकाळी सहाडेआठपर्यंत गेल्या चोवीस तासांत सरासरी ६५.१० मिलीमीटर पाऊस नोंदला गेला.

उस्मानाबाद, वाशी, भूम तालुक्यांत अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील ४२ पैकी १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. सर्वाधिक १३३ मिलीमीटर पाऊस उस्मानाबाद शहरात नोंदला गेला आहे. गेल्या दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) रात्रीपासून सर्वदूर पाऊस झाला. रात्रभर कमी- अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. उस्मानाबाद शहरात शनिवारी रात्री नऊच्या सुमारास सुरू झालेला पाऊस रविवारी (ता. २०) दुपारी बारापर्यंत सुरूच होता.

उस्मानाबाद तालुक्यात ९९.७५, तुळजापूर तालुक्यात ४९.००, उमरगा तालुक्यात ५०.००, लोहारा तालुक्यात ६०.६७, कळंब तालुक्यात ५५.६७, भूम तालुक्यात ७६.२०, वाशी तालुक्यात ७१.६७, परंडा तालुक्यात ५७.८० मिलीमीटर पाऊस गेल्या २४ तासांत नोंदला गेला. १६ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. त्यात नारंगवाडी 87.00, वाशी 90.00, उस्मानाबाद शहर 133, उस्मानाबाद ग्रामीण 108, तेर 102, बेंबळी 75, जागजी 88, पाडोळी (आ.) 120, ढोकी 92, केशेगाव 80, भूम 105, माणकेश्वर 80, ईट 101, जवळा (नि.) 65, सलगरा (दिवटी) 81 आणि कळंब 75 मिलीमीटर पाऊस नोंदला गेला. रात्रभर पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचले आहे. तूर आणि कापूस पिकांना या पावसामुळे जीवदान मिळाले आहे.

मराठवाडा

पूर्णा (परभणी): तालुक्यातील बरबडी येथील लक्ष्मण गणेश सोलव या बावीस वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे गळफास घेऊन...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मराठवाडा जनता विकास परिषदेच्या पाठपुराव्याला यश औरंगाबाद : दमणगंगेचे पन्नास टीएमसी (50 अब्ज घनफुट) पाणी गोदावरी खोऱ्यात सोडून...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

लोहा : बैलगाडा घेऊन शेतीकामाला जात असताना बैलगाडा उलथून झालेल्या अपघातात शेतमजुराचा मृत्यू झाला. ही घटना हिप्परगा गावालगतच्या...

मंगळवार, 19 सप्टेंबर 2017