परभणी जिल्ह्यात यंदा मुबलक खत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

खरिप हंगामासाठी जिल्ह्यात कापसाच्या विविध कंपन्याच्या बियाणांची तीन लाख ५० हजार पाकीटे दाखल झाली असून सोयाबीनचे ३५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे.

परभणी- खरिप हंगामासाठी जिल्ह्यात कापसाच्या विविध कंपन्याच्या बियाणांची तीन लाख ५० हजार पाकीटे दाखल झाली असून सोयाबीनचे ३५ हजार क्विंटल बियाणे जिल्ह्यात उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बियाणे टंचाई होणार नसून खतही मुबलक प्रमाणात शिल्लक असल्याने शेतकऱ्यांना रांगेत उभे राहण्याची गरज नाही.

परभणी जिल्ह्यात खरिप हंगामासाठी पाच लाख २१ हजार ८१० हेक्टर क्षेत्र प्रस्तावीत केले आहे. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस, तूर ही पिके महत्वाची आहेत. सोयाबीनचे दाेन लाख आठ हजार ११० हेक्टर तर कापसाचे एक लाख ७० हेक्टर क्षेत्र तर तूरचे ६० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. यंदासाठी सोयाबबनीचे ३५ हजार क्विंटल बियाणे बाजारात दाखल झाले आहे. कापसाच्या लागवडीसाठी तब्बल तीन लाख ५० हजार पाकीटे जिल्ह्यात आली असून अजून ५० हजार पाकीटे येत्या काही दिवसात येणार आहेत. तर एक लाख ५० हजार मेट्रीक खताची मागणी कृषि विभागाने केली असून ८५ हजार ९०० मेट्रीक टन आवंटन मंजूर झाल्यापैकी ९८ हजार ४७१ मेट्रीक टन उपलब्ध झाला आहे. गतवर्षीचे खत शिल्लक असल्याने यंदा खताची टंचाई नाही.